हायपरथायरॉईड, न्यूक्लेअर थायरॉईड स्कॅन आणि I-131 थेरपी
लक्ष केंद्रित न होणे, थकवा, मासिकपाळी संदर्भातील त्रास, शौचास जास्त वेळाजावे लागणे, जास्त घाम येणे, जास्त भूक लागणे, उष्णता सहन न होणे, वजन कमी होणे यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. जनसामान्यांना थायरॉइड या आजाराची माहिती करून देणं, आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी २५ मे, जागतिक थायरॉइड दिनानिमित्ताने हा लेख. कर्करोग, क्षयरोग या आजारांविषयी लोकांमध्ये जागृती दिसून येते. मात्र ‘थायरॉइड’ या आजाराविषयी लोकांमध्ये म्हणावी तितकी जागृती दिसून येत नाही.
थायरॉईड म्हणजे काय ?
थायरॉईड ही शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे. फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी गळ्याच्या पुढच्या भागात असते.
थायरॉईडचे कार्य काय आहे ?
ट्रायआयडोथायरोनीन/ Triiodothyronine (T3) & थायरॉक्झीन/Thyroxine (T4) ह्या रासायनिक स्त्रावांची म्हणजेच हार्मोन्सची निर्मिती थायरॉईड ग्रंथी करते. इतर हार्मोन्स प्रमाणे थायरॉईड हार्मोन्स आपल्या शरीरातील विविध भागांतून विशिष्ट संदेश शरीरातील इतर इंद्रिये व पेशीपर्यंत पोहोचवून शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करतात. उदा. चयापचय क्रिया, शरीरातील उर्जेचा वापर व साठवणूक, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे. TSH(Thyroid stimulating hormone) हे पिट्युटरी (Pituitary/master gland) ग्रंथीमधून तयार झालेले हार्मोन थायरॉईड ग्रंथीला T3 व T4 तयार करण्यास चालना देते व त्यावर नियंत्रण ठेवते.
थायरॉईडचे आजार कोणते ?
सर्वसाधारणपणे त्यांचे तीन प्रकार करता येतील.
१) हायपोथायरॉईडीझम २) हायपरथायरॉईडीझम ३) थायरॉईडच्या गाठी
हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय ?
हायपोथायरॉईडीझम म्हणजे थायरॉईडच्या हार्मोन्सचे (T3 व T4) प्रमाण कमी होणे होय.
हायपोथायरॉईडीझमची लक्षणे काय आहेत ?
चेहऱ्यावर, अंगावर सूज येणे
वजन वाढणे
बद्धकोष्ठ
मासिक पाळीच्या समस्या
थकवा, औदासिन्य(Depression), चीडचीडेपणा
आजार खूप वाढल्यास थायरॉईड कोमा व मृत्यू
हायपोथायरॉईडीझम उपचार कसे करतात ?
यावर अगदी सोपा उपचार आहे. थायरॉक्झीन (Thyroxine) हे थायरॉईडचे हार्मोन कृत्रिमरीत्या तयार केले जाते. याची गोळी दररोज उपाशीपोटी घ्यावी लागते.
हायपरथायरॉईडीझमची लक्षणे
- चिडचिडेपणा / अस्वस्थता
- स्नायू कमकुवत होणे / थरथरणे
- अनियमित, कमी प्रमाणात मासिक स्त्राव
- वजन कमी होणे
- झोप नीट न लागणे
- वाढलेली थायरॉईड ग्रंथी
- दृष्टीदोष किंवा डोळ्यांची जळजळ होणे
- उष्णता सहन न होणे
हायपरथायरोईडझम कारणे काय आहेत?
याचे मुख्य कारण म्हणजे आपली रोगप्रतिकार प्रणाली आपल्या थायरॉईडवर काही कारणामुळे हल्ला करून तिला हानी पोहोचवते व त्यामुळे ती भरपूर प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स तयार करत.
थायरॉयडीटीस – म्हणजे थायरॉईड ग्रंथीचा दाह. यामुळं, तयार होणा-या संप्रेरकांचे प्रमाण भरपूर असत.
हायपरथायरॉईड लोकांकरता उपाय काय?
- अॅन्टीथायऱोईड मेडिकेशन
- रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन
- (गरजेनुसार) सर्जरी
अॅन्टीथायऱोईड मेडिकेशन सुरुवातीला दिल्या जातात . बरेच रुग्ण मध्ये याने आराम पडतो . परुंतु काही रुग्नांना त्रास सुरूच असतो . ७ -१०- वर्षे गोळ्याघेतल्या नंतर पण अराम नसतो . अश्या रुग्नांना रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन (I-131) थेरपी दिली जाते . हि गोळी किंवा पेय च्या स्वरूपात असते . रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन दिल्या नंतर ती थायरॉईड मध्ये जाते व जास्त कार्य करत असलेलं ग्रंथी वर बीटा रे”स (BETA –rays) ने वार करून तिथल्या पेशी जाळून टाकते . थायरॉईड चे कार्य मुळातून कमी होते.
रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन थेरपी च्या पुरवी थायरॉईड स्कॅन (99m Tc) करून बघितल्या जाते कि थायरॉईड किती प्रमाणात जास्त कार्य करत आहे
रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन फायदे:-
- त्याची अॅन्टीथायऱोईड मेडिकेशन कायम स्वरूपी बंद होते
- त्रास कमी होतो
- गळ्याची सूज कायम स्वरूपी कमी होते (सर्जरी शिवाय )
- राहणीमान मध्ये सुधार होते
- काम मध्ये फरक पडतो.
तर अश्या प्रकारे हे रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन एक राम बाण विलाज आहे . रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन ,नुकलेअर मेडिसिन विभागात उपलब्ध असते.
डॉ .प्रफ्फुल व्ही .जटालें ,
न्यूकलेअर मेडिसिन व थायरॉईड तज्ज्ञ
एम .बी .बी.एस ,डी .आर .एम , डी .एन .बी , फेल .युरोपियन बोर्ड ,सी .सी.एम. टी .डी (थायरॉईड डिसॉर्डर्स ).
युनाइटेड सीगमा हॉस्पिटल ,औरंगाबाद
९८८१६४८०८८, [email protected]