Patient Testimonial

Home / Patient Testimonial

हॉस्पिटल मधील सर्व प्रशासकीय वृंद, वैद्यकीय वृंद यांची चांगली वर्तवणूक, नम्र व तत्पर सेवा उपलब्ध झाली, तसेच डॉ.देवधर सरांचे आम्ही ऋणी आहोत.

-आशा कमलेश पिंगळे, कमलेश दत्तात्रय पिंगळे

We Nagarkar and Karwa family thank all the doctors who saved the life of our granddaughter Mahek. Mahek’s discharge and coming back to home is a memorable gift of deepawali to all of us. We wish many more lives to be saved by the new technique of ECMO. Special thanks to Dr. Unmesh Takalkar and Dr Anand Deodhar, Dr Samid Patel, Dr Umesh Gawali for their day and night efforts to save our Child’s life. For all of us for “Anand Deodhar is Anand. Deoghar” a gods place who has taken lot of efforts to save the life.

Ratan Nagarkar

(Grandfather)

कृतज्ञता

डॉक्टर नाही देवदूत नाही मग आपण आहेत तरी कोण ? आपण आहेत साक्षात देव ! कारण फक्त देवच माणसाला मृत्युच्या दारातून परत अनु शकतो हे केलय आपण माजासाठी ! शतदा प्रेम करावे असे जीवन मी जगावे यासाठी हीच तुमच्याविषयची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेली हि ।

स्वरचीत कविता

सिग्मा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध नाव आहे आज सगळ्यांच्याच मनात विश्वास काय आहे राज

अचूक निदान वेळेत उपचार कौतुक डॉ. उन्मेष टाकळकर सरांच्या

वेळेचे नियोजन चालण्याची स्पीड, नाते स्टाफशी जिव्हाळ्याचे,

मोठा परिसर सिग्माचा नेहमीच पडतो कमी

शंभरटक्के बरे होण्याची रुग्णांच्या मनात असते हमी

जीवन मरणाच्या या खेळात आम्हास मिळतो त्यांचाच आधार

हा तर आमच्यासाठी आहे देवाचाच अवतार

माणुसकी देवाला ह्या उदंड आयुष्य लाभू दे

विश्वजगतामध्ये डॉ. उन्मेष टाकळकर सरांचे नाव गौरवू दे

विश्वजगतामध्ये डॉ. उन्मेष टाकळकर सरांचे नाव गौरवू दे

प्रविणा पार्डीकर

औरंगाबाद

“II श्री ll”

“एक परोपकारी डॉक्टर”

श्री उन्मेष टाकळकर (MBBS,MS) हे माझे लहानपणचे जवळचे मित्र १८८१ मध्ये आम्ही दोघेही एस एस सी पास झालो तेव्हा ते एकटे १० मध्ये जालना जिल्हातून मेरीट मध्ये आले मी तिसऱ्या क्रमांकावर होतो. माझी परिस्तिथी नाजुक होती एका ड्रेसवर आणि बिना टूशनचे घरीच अभ्यास करीत असे. एस एस सी नंतर ते १२ मेरीट मध्ये उतीर्ण झाले. त्यांनी यापुढचे शिक्षण स्विझर्लंड मध्ये आणि अमेरिकेत केले आणि ते आता औरंगाबादचे एक प्रशिद्ध डॉक्टर झाले आहेत त्यांचे ब्रीद वाक्य म्हणजे “SERVICE TO HUMANITY SERVICE TO GOD” ते आता औरंगाबादमध्ये तीन दवाखाने चालवतात आणि वर्षातून १० दिवस अमेरिकेमध्ये CAMP उत्कुष्ट्पणे चालवतात. त्यांनी मला २००७ मध्ये एका प्रदीर्घ आजारातून तारले दुसरे म्हणजे ते कॅन्सर तज्ञ पण आहेत हे त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये एक प्रसिद्ध दवाखाना “UNITED CIIGMA” या सर्व रोगांवर SERVICE देणे त्यांनी सुरु केले. मी DIPLOMA IN CIVIL ENGINEERING हि पदवी घेतली आणि BSNL मध्ये SERVICE करत आहे. तर शेवटी या पुढचा काळ भरभराटीचा आणि सुखी समृद्धीचा जावो ही माझ्या एका गरीब मित्राच्या सुभेच्चा आणि हिच ईश्वर चरणी प्रार्थना. .

श्री शरद मोहिते

BSNL Aurangabad

“II श्री ll”

“जनसेवा हीच ईश्वर सेवा”

“माननीय डॉ.साहेब व सौ व सर्व डॉक्टर यांना स.न.वि.वि.,

सर्व रोग शिबीरात आलो वारकऱ्याला श्री. विठ्ठल भेटावा व रुक्मिणी माता भेटावेत तसे मला वाटले एकादशीचे अगोदर कार्यक्रम आयोजित केला आनंद वाटला. सर्व डॉ. मंडळी व कर्मचारी यांना उदंड आयुष्य लाभावे हि गजानन चरणी प्रार्थना डॉ. टाकळकर साहेब (श्री. विठ्ठल) व सौ. डॉक्टरीण बाई (रुख्मिणी माता) या सारखे भासले, यांना उदंड आयुष्य लाभावे हि पुनश्च प्रार्थना “.

- एच.आर.चव्हाण

भटका पेशंट

“बायपास सर्जरी”

“एक गोड अनुभव….”

सिग्मा हॉस्पिटलच्या ५ व्या वर्धापन दिना निमीत्त हार्दिक शुभेच्छा.दि.२० सेप्टेंबर २०१६ माझा आयुष्यातील महत्वाचा दिवस. प्रवासामध्ये मला हार्ट प्रॉब्लेम जाणवला व मी सर्जरीसाठी सिग्मामध्ये भरती झालो. अमरावतीच्या डॉक्टरांनी त्वरित नागपूरला जायचा सल्ला दिला. परंतु डॉ आनंद देवधर साहेबाना जेव्हा माझा रिपोर्ट whatsapp वर दाखवला तेव्हा त्यांनी पेशंटला १० दिवस काहीच होत नाही असा सल्ला दिला.मुलांनी मला सिग्मा मध्ये भरती केले.सर्व तपासण्या पुर्ण करून माझी दि २०/९/२०१६ रोजी बायपास सर्जरी करण्यात आली. आज दोन वर्ष पुर्ण होत आहे. डॉ देवधर साहेबांनी मला २५ वर्षांचे जीवदान दिले त्याबद्दल मी सर्व सिग्मा मधील सहकार्य केल्या बद्दल आभार मानतो. विशेष करून ICU मधील स्टाफने व कृष्णा नावाच्या वार्डबॉयने मला फार मोठी हिम्मत दिली. डॉ.आनंद देवधर व त्यांच्या सहकार्याचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. सिग्मा हॉस्पिटल मध्ये अगदी घरच्या सारखे वातावरण सुंदर व स्वच्छ जाणवले. सर्व स्टाफ प्रेमाने विचारपूस करतात. मी पण तपासणी साठी आल्या नंतर सर्व स्टाफशी चर्चा करतो. सर्जरी साठी आलेल्या पेशंट ना योग्य सल्ला देत असतो. त्यामुळ त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना आनंद वाटतो. शेवटी हॉस्पिटलला मंदिर व डॉक्टरांना देव मानले तर सर्व अडचणी अपोआप दूर होतात हे सत्य आहे. धन्यवाद……..

सुनील शामराव भव

औरंगाबाद

“डॉ. टाकळकर साहेब सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद

सर, आपण भगवान /ईश्वर/ अल्लाह आहात देवाचे दुसरे रूप आहात. मी केवळ आणि केवळ आपण व आपल्या टिममुळे जिवंत राहू शकलो. शेवटच्या क्षणाला एका श्वासासाठी किती धडपड करावी लागते हे प्रत्यक्ष अनुभवलं ! वारंवार मृत्युच्या दारातून परत येत होतो. मृत्यूवर सुद्धा विजय मिळवता येतो तो फक्त डॉक्टरच्या मार्फत. आपण वेळीच घेतलेले सर्व निर्णय अचूक होते म्हणून मला जीवदान मिळाले. मी व माझे कुटुंबीय, पोलीस परिवार, आपले व सिग्मा हॉस्पिटलच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानतो. बोलता येत नसल्यामुळे हस्तलिखित आभार संदेश . जय हिंद सर ”

श्री गोवर्धन कोळेकर

ACP औरंगाबाद

Service in the United CIIGMA Hospital was very satisfactory and trustworthy. I recovered in a very less time. Shouldn’t say this but would love to be admitted if needed.

Pushkar Ganesh Kudlikar

Aurangabad

सर्वोभावी वृत्तीने सुरु केलेले रुग्णालय डॉ. टाकळकरांची मराठवाड्यात व जगभरात वैद्यकीय क्षेत्रात उंची वाढवेल. डॉ. टाकळकरांना खूप खूप शुभेच्छा!

सुनील शामराव भवर

औरंगाबाद

मा. डॉ. देवधर सरांबद्दल प्रतिक्रिया करायची असेल तर ‘न भूतो न भविष्यम’ असे डॉक्टर होणार नाही असेच म्हणावे लागेल. त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

राजेंद्र बालाजी गवई

औरंगाबाद

माझ्या आईचे ऑपरेशन झाल्यापासून गेल्या तीन वर्षांमध्ये आम्हाला सिग्मा हॉस्पिटल मध्ये ब्रदर पासून ते डॉक्टरांपर्यंत चांगली वागणूक मिळाली. हॉस्पिटल मधील एकंदरीत सेवा सुविधा चांगली आहे.

श्रीमती. जयाबाई नारायण श्रीखंडे

औरंगाबाद

जर मला युनाइटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाला नसता तर मी या जगात दिसलो नसतो. सर्व डॉक्टर स्टाफ हा देवरूपी आहे. असेच सर्वांनी सेवा देत रहावे.

सुनिल संपतराव पाखरे

औरंगाबाद

हार्दिक शुभ कामना,

‘शिव भावे’ घडते आपल्या हातून रुग्ण सेवा,

त्यातून मिळतो अध्यात्मिक आनंदाचा ठेवा।

घडता आपल्या हातून अशी सेवा,

रुग्णांच्या पाठीशी आशीर्वादाचा ठेवा।

वैदकीय अधिकाऱ्या सवे सर्व कर्मचारी,

रुग्णांची परोपरी करतात सेवा चाकरी।

सेवेचा आनंद घेऊन जातो घरी,

नित्य आपली आठवण राहील जीवनानंतरही।

अशीच घडो आपल्या हातून रुग्णांची सेवा,

नित्य मिळेल आपल्याला शुभ आशीर्वादाचा मेवा।

सोपान नारखेडे देतो आपणास हार्दिक शुभकामना,

उत्तरोत्तर घडो दवाखान्याची प्रगती हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

सोपान नारखेडे

औरंगाबाद

सिग्मा हॉस्पिटलबद्दल आजपर्यंत फक्त ऐकले होते पण आज प्रत्यक्ष अनुभव आला. आपल्या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफची भाषा अतिशय नम्रतेची आहे. सर्व गोष्टी समजावून सांगण्याची त्यांची पद्धत खूप चांगली आहे. हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर २५% आराम अगोदरच मिळून जातो.

पवनकुमार भाऊसाहेब कदम

औरंगाबाद

सादर प्रणाम

मी आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंदजी देवधर यांच्या शुभहस्ते ‘हृदय शस्त्रक्रिया’ करून घेतली. त्या निमित्त दि. २३/१२/२०१७ ते ०१/०१/२०१८ भरती होतो. डॉ. संचेती लोनार यांच्या मार्गदर्शनानुसार आपले हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना फार चांगले अनुभव प्राप्त झाले. त्यातील काही प्रमुख अनुभव खालीलप्रमाणे:

 

शिष्ठबद्ध प्रवेश प्रक्रिया.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हेच प्रत्यंतर.

गरीब असो या श्रीमंत सर्वांना समान वागणूक.

सेवाव्रती कर्मचाऱ्यांना मामा, मावशी या जिव्हाळ्याचा नावाने संबोधन हृदयाला स्पर्श करून जाते.

दवाखान्याचा सर्व विभागामधील स्वच्छता.

प्रत्येक वॉर्ड तथा विभागप्रमुखांचे मार्गदर्शन.

महात्मा फुले जीवनदायी योजना सेल कर्मचाऱ्यांचे सहकार्य.

अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञांचे वेळोवेळी भेटी व मार्गदर्शन व वेळेचे बंधन.

अंतर्गत सुरक्षा व्यवस्था व लिफ्टचे नियोजन.

चहलपहल असतानाही निरव शांतता.

मला हृदयशत्रक्रियेचा माध्यमातून हॉस्पिटलमध्ये उपयुक्त सहकार्याबद्दल ;हार्दिक अभार’. आपण स्वीकारलेल्या या व्रताला शतशः प्रणाम व प्रांजळ शुभेच्छा!

प्रकाश छो. सुपटयाण

माऊलीनगर, लोणार

डॉक्टर उन्मेष टाकळकरांवर आमचा खूप विश्वास आहे, म्हणूनच आम्ही नेहमी युनाइटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये येतो.

सुनीता शरद पद्ये

औरंगाबाद

आम्हाला युनाइटेड सिग्मा हॉस्पिटल मध्ये सर्वात चांगली सेवा मिळाली. पुणे रुबी हॉलपेक्षाही चांगले सहकार्य मिळाले.

विनोद हरसिंग परदेशी

औरंगाबाद

हॉस्पिटलमधील सर्व घटक, डॉक्टर, स्टाफ, स्वच्छता, औषदे चांगल्या दर्जाची आहेत. आम्हाला इथे आल्यावर आम्ही देवळातच वास्तव्यास आहोत व सर्व डॉक्टर म्हणजे देव भेटावयास येत आहेत असा अनुभव आला.

प्रसाद रामकृष्ण देशपांडे

औरंगाबाद

हॉस्पिटल मधील आरोग्य सेवा, उपचार, सोयी व सुविधा उत्कृष्ट दर्जाची असून, त्यासाठी आम्ही आभारी आहोत.

प्रदीप राजाराम भालेराव

औरंगाबाद

We are satisfied with your hospital’s services. Thanks to all employees of CIIGMA Hospital.

Jadhav Krishna Madhukar

Aurangabad

सिग्मा हॉस्पिटलमध्ये आल्यावर आणि इथल्या डॉक्टरांनी दिलेल्या आधारामुळे व उपचारामुळे खूप समाधानी झालो.

राम विश्वनाथ गव्हाणे

औरंगाबाद

प्रवेशावेळी मनात असणारी भीती व मनातील शंकेचे पूर्ण निरसण होऊन जाताना मन अगदी प्रसन्न झाले व यानंतर कोणताही उपचार करावयाचा असेल तर फक्त युनाइटेड सिग्मा हॉस्पिटलमध्येच करणार हे मनाशी पक्क केलं.

वसंत गंगाधर पांडे

औरंगाबाद

आदर पूर्वक नमस्कार,

तुम्हाला डॉक्टर म्हणू , का माझ्या जीवनाचा तारणहार म्हणू, हा प्रश्न नेहमीच मला सतावत राहिला आहे. वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांकडून सेवाभावी सुश्रुषा मिळणे, हे आजकाल अवघड झाल आहे. डॉक्टरांच्या प्रतिमे प्रति विविध तर्क असतील, परंतु या सर्व प्रतिमेला नुसता तडा देणार असे नव्हे, तर देवासमान ज्याचा उल्लेख नेहमीच व्हावा, असे व्यक्तिमत्व म्हणून मी अपना सर्वाकडे पाहतो. आजारपणातील अगतिकता एका रुग्णाला डॉक्टरावर भरोसा ठेवण्यासाठी प्रेरित करून जाते, यात वाद नाही. परंतु डॉक्टरांवर अशी श्रधा ठेवल्या नंतर माझा डॉक्टर या श्रद्धेला पात्र ठरण, हा जीवन सार मला आपल्या कडील अनुभवातून मिळाला. आजारपणाच्या निमित्ताने मला आपले सानिध्य लाभल्यानंतर आपण ज्या पद्धतीनी माझी काळजी घेतलीत, आपल्या कडील सन्माननीय डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. आशिष देशपांडे, डॉ भरतकुमार, डॉ. विरेद्र वडगावकार, डॉ. राजकुमार घुमरे , डॉ. अजय रोटे, तसेच नर्सिंग, सर्व सहकारी कर्मचारी या सगळ्यांनी मिळून ज्या एकसंघ वृतीने माझ्यावर आलेल्या अरीष्ठाला परतवून लावले, त्याची स्तुती करणे हि केवळ औपचारिकता होईल. परंतु जे अपार कष्ट आपण माझ्यासाठी घेतलेत, त्याची भरपाई कधीच होऊ शकणार नाही, याबाबतचा विश्वास मी निरंतर बाळगणे, हीच आपल्या ज्ञानाच्या कौशल्येला दिलेली एक उचित पावती ठरेल. डॉक्टरांना देव का म्हटल जात, याच उत्तर मी आपल्या सानिध्यात राहून अनुभवातून घेतले . यासाठी मी भगवंताचा अतिशय ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या हातून नित्यनियमे हे सत्कर्म घडत राहो. आपण हा जनसेवेचा घेतलेला वसा असाच चालत राहो, या बद्धल मी देवाला अगदी साकडे घालतो. मी तुमचे वैयक्तिक आभार मानल्यापेक्षा, आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्ण सेवेचा जो होम हाताळण्याचे कसब पेलले आहे, त्या बाबत उपकार जाणीव ठेवणे, हे मी माझे आद्य कर्तव्य मानतो. सधन्यवाद.

अशोक सूर्यवंशी

लक्ष्मी क्लॅथ सेंटर, उस्मानपुरा, औरंगाबाद

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा; हे युनाइटेड सिग्मा चे वैशिष्ट्य व इथे आल्यावर प्रत्यक्षात हीच अनुभूती आली. इथे घरच्यापेक्षाही चांगली सेवा मिळाली.

अशोक सूर्यवंशी

औरंगाबाद

सिग्मा हॉस्पिटल मधील सर्व स्थरातील टीमचे कार्य कौतुक करण्यासारखे आहे. विशेषतः डॉ. देवधरांना माझ्या कोटी कोटी शुभेच्छा.

दिपक दिनकर जायभाय

औरंगाबाद

आमच्या रुग्णाची खूप साध्यता केली याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद!

राजू हाबू पवार

औरंगाबाद